बिग ब्रेकिंग! अमेरिकेचा भारतावर डबल अटॅक

Admin
1 Min Read
  • भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. 30 जुलै रोजी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर आता त्यांनी भारतावर 50 टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी मंगळवारीच सांगितले होते की, मी पुढील 24 तासांत भारतावरील टॅरिफ वाढवणार आहे.
  • ट्रम्पची इच्छा आहे की, भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये व्यापारी तणाव दिसून येत आहे. यापूर्वी देखील ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदी करण्याचा आरोप करत 24 तासांच्या आता भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. तर आता ट्रम्प यांनी भारतावर 25 अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला आहे.
Share This Article