मनोरंजन

सूर्यवंशम फेम सौंदर्याचा मृत्यू अपघात नव्हे तर हत्या

  1. ‘सूर्यवंशम’ फेम अभिनेत्री सौंदर्याच्या मृत्यूनंतर 22 वर्षांनी नवीन ट्विस्ट घेतला आहे. सौंदर्याचा मृत्यू घात होता की अपघात? असा प्रश्न निर्माण झाला आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते मोहनबाबू यांच्याविरुद्ध आंध्रप्रदेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, सौंदर्याचा मृत्यू अपघात नव्हता.
  2. सौंदर्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौम्या सत्यनारायणचा 17 एप्रिल 2004 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. विमान बेंगळुरूजवळील कृषी विज्ञान विद्यापीठाच्या गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या कॅम्पसमध्ये कोसळले. मात्र, सौंदर्याच्या मृत्यूच्या 22 वर्षांनंतर मृत्यू अपघात नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील खम्मम जिल्ह्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार चिट्टीमल्लू यांनी आरोप केला आहे की, सौंदर्याचा मृत्यू अपघाती नव्हता. तर तेलुगू अभिनेता मोहन बाबूसोबतच्या मालमत्तेच्या वादाशी संबंधित खून होता.
  3. तक्रारदाराने असा दावा केला आहे की, सौंदर्याने मोहनबाबूला सहा एकर जमीन विकण्यास नकार दिला होता. मोहनबाबू ही गोष्ट सहन करू शकला नाही. त्यानंतर काही दिवसातच सौदर्यां आणि तिचा भाऊ यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. अनेक अहवालांनुसार, भाजप आणि तेलगू देसम पक्षाच्या राजकीय प्रचारासाठी करीमनगरला जात असताना त्यांचे विमान क्रॅश झाले होते. अहवालात असेही म्हटले आहे की सौंदर्याचा मृत्यू झाला तेव्हा ती गर्भवती होती.
  4. अभिनेता मोहनबाबूविरुद्ध चित्तमुल्ला नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, सौंदर्याच्या मृत्यूनंतर मोहन बाबूने तिच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला. तक्रारदाराने असेही म्हटले आहे की, अभिनेता मोहनबाबूमुळे त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याने संरक्षणाची मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button