क्राईम
स्वारगेट अत्याचार प्रकरणात मोठा ट्विस्ट

- स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. या धक्कादायक प्रकारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी मोठी यंत्रणा कामाला लावली होती.
- या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट पहावयास मिळत आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने नवी मागणी केली आहे.
- या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दाखल झाला आहे. पुणे पोलिसांकडून मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, मिसर यांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांना नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
- पुणे पोलिसांकडून याबाबत वेगळेच स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार पीडित तरुणीने अर्ज देण्यास उशीर केल्याचे पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात येत्या काळात सरकारी वकील कोण असणार? हे पहाणे महत्त्वाचे असणार आहे.