खेळ
फायनलमधील खेळीने डावच पलटवला

- चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रविवारी भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
- या विजयाचा परिणाम आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही स्पष्ट दिसत आहे, जिथे अनेक भारतीय खेळाडूंनी झेप घेतली आहे.
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रविवारी 76 धावांची शानदार खेळी करणाऱ्या रोहितने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तो पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. रोहितला या निर्णायक खेळीचा मोठा फायदा झाला आणि त्याच्या कामगिरीमुळे तो दीर्घकाळानंतर टॉप-3 फलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकला.
- दरम्यान, शुभमन गिलने आपले अव्वल स्थान कायम राखले असून पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने स्थान प्रगती करत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. विराट कोहलीला मात्र एक स्थान गमवावे लागले असून तो चौथ्या वरून पाचव्या स्थानी गेला आहे.