क्राईम
ब्रेकिंग! मोकारपंतीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपची कुंडली

- सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला ३ महिने उलटले. सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपत्रातून अनेक बाबी समोर येत आहेत. या दोषारोपत्रात मोकारपंती ग्रुपची कुंडली समोर आली आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये किती सदस्य होते?
- या ग्रुपच्या डीपीमधील ती तरूणी कोण आहे? देशमुखांना मारहाण करताना किती वेळा कॉल करण्यात आला होता? याची उत्तरं दोषारोपत्रात नमूद करण्यात आली आहे.
- देशमुखांना मारहाण करताना मोकारपंती ग्रुपमधून व्हिडिओ कॉल लावण्यात येत होते. देशमुखांना अमानूष मारहाण करताना व्हॉट्सअॅप
- ग्रुपवर कॉल हा चालूच होता. आरोपपत्रात त्याचा स्क्रीनशॉटही जोडलेला आहे.
- या ग्रुपच्या डिस्प्ले फोटोवर एका तरूणीचा फोटो असून, या ग्रुपमध्ये किती सदस्य आहेत, हत्येवेळी किती वेळा कॉल केले, याची माहिती आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.
- मोकारपंती व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एकूण १४ सदस्य आहेत. या ग्रुपचा ऍडमिन फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे. जेव्हा दिवंगत देशमुख यांना मारहाण करण्यात येत होती, त्यावेळी या ग्रुपमधून ४ व्हिडिओ कॉल करण्यात आले होते. ते सर्व कॉल आंधळेने केली असल्याची माहिती समोर आली आहे.
- मोकारपंतीच्या ग्रुपच्या डीपीमध्ये एक तरूणी आहे. डीपीमध्ये टू पीस कपडे घालणारी तरूणी आहे. या ग्रुपमध्ये १४ सदस्य असल्याची माहिती आहे. महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतिक घुले यांच्यासह १४ जण ग्रुपमध्ये होती. ज्यावेळी कॉल केले, त्यावेळी वाल्मिक कराडही ते बघत होता, असा दावा आधीच सुरेश धस यांनी केला होता.