ब्रेकींग! आईसह दोन चिमुकल्यांचा विहिरीत बुडून मृत्यू

Admin
0 Min Read

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावात अज्ञात कारणावरून आईने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये आईसह दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे.

ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यात चित्रा बाळासाहेब हाक्के (वय 28) पृथ्वीराज बाळासाहेब हाक्के (वय पाच) आणि स्वराज बाळासाहेब हाक्के (वय दोन सर्व. रा. वांगी, ता. उत्तर सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत पोलीस तपास सुरु आहे.

Share This Article