मनोरंजन

लोकप्रिय अभिनेत्री शुभमन गिलच्या प्रेमात?

  • टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर आणि भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. अवनीतने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे या अफेअरच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींमध्ये नाते जुळाल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी पाहायला मिळाली आहेत. याच पार्श्वभूमीवर अवनीत आणि शुभमन यांच्याविषयी चर्चा होत आहे.
  • अवनीत कौरने दुबई इंटरनॅशनल स्टेडियममधून शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यानचे फोटो पोस्ट केले. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स करत तिला शुभमन गिलबाबत प्रश्न विचारले. काही युजर्सनी तर तिला “शुभमनला आमचा जिजू बनव” असेही म्हटले. अवनीत आणि शुभमन यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे काही बोललेले नाही. मात्र, त्यांची सोशल मीडियावरील सक्रियता आणि काही सार्वजनिक ठिकाणी एकत्र आल्याच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याआधी ते एकमेकांच्या पोस्ट्सवर कमेंट्स करताना दिसले होते आणि त्यांच्यात खास मैत्री असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या.

Related Articles

Back to top button