मनोरंजन
‘छावा’च्या गर्जनेने बॉक्स ऑफिस हादरले

- छावा चित्रपटाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून इतिहासच रचला आहे. तेविसाव्या दिवशी 16.5 कोटींची कमाई करत पाचशे कोटींचा टप्पा पार केला आहे. आज रविवार आहे. त्यामुळे या दिवसात चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून तेविसाव्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने 16.5 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने तेविसाव्या दिवसाच्या उत्पन्नाच्या बाबतीत मोठे रेकॉर्ड करत पाचशे कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे.
- छावा सिनेमाच्या आतापर्यंतच्या कमाईचा विचार केला तर पहिल्याच दिवशी 31 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने एकूण 219.23 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 180.25 कोटी तर तिसऱ्या आठवड्यात 84.5 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले होते. 22 व्या दिवशी चित्रपटाने देशभरात 8.75 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.
- दरम्यान, छावा चित्रपटाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. तेवीस दिवसांनंतरही चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. 23 दिवसांत चित्रपटाने एकूण 508 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचशे कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणारा छावा हा 2025 मधील पहिलाच चित्रपट ठरला आहे.