क्राईम

संतोष देशमुख हत्या… त्यामागे धनंजय मुंडेच!

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन पुरावे समोर येत आहेत. त्यामुळं राज्यात वातावरण तापलेलेच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील देशमुख हत्या प्रकरण लावून धरले आहे. त्यांनी अनेक गौप्यस्फोट देखील केले होते. त्यानंतर देशमुख यांना मारहाण केल्याचे फोटो व्हायरल झाले. यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान दमानिया यांनी मुंडे यांच्यावर आता पुन्हा नवीन आरोप केला आहे .

X अकाउंटवर पोस्ट शेअर करत दमानिया यांनी म्हटले की, गेले काही दिवस एक व्यक्ती मला काही माहिती देण्यासाठी बरेच फोन करत होते. त्यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मुंडे यांच्या सांगण्यावरून ( व्हॉट्सअप वर संपर्क ठेऊन) खालील माणसे काम करत होती.

1. शिवलिंग मोराळे – ज्यांनी स्कॉर्प्यूओ मधून कराड ला CID ऑफिस मधे आणले.

2. बालाजी तांदळे- ज्यांनी पोलिसांना घेऊन आरोपींचा शोध घेतला आणि 3. सारंग आंधळे – माहिती देणे.

म्हणून या लोकांना अटक होणार नाही, कारण तसे झाल्यास त्यांचे फोन जप्त होतील. मग त्यामागे मंत्री मुंडे आहेत, हे स्पष्ट होईल. ही मला मिळालेली माहिती, मी पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी याचे इन्वेस्टीगेशन करावे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button