क्राईम

माझ्या वडिलांचा खंडणीसाठी जीव गेलाय, ती खंडणी कोणासाठी मागितली जात होती? त्यांचा काय गुन्हा होता?

  • बारामतीमध्ये आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा होता. यावेळी वैभवी देशमुख हिला अश्रू अनावर झाल्याचे समोर आले आहे. 
  • आरोपींना फाशी व्हावी, या मागणीसाठी बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि बंधू धनंजय देशमुख सुद्धा सहभागी झाले होते.
  • बारामतीकरांसोबत बोलताना वैभवीला अश्रू अनावर झाले होते. यावेळी वैभवी म्हणाली की, माझ्या वडिलांवर झालेल्या अन्यायाविरोधात आम्ही न्याय मागतोय. सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. सीआयडी योग्य दिशेने तपास करत आहे. राहिलेल्या एका आरोपीला सुद्धा लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी वैभवीने केली. यावेळी वैभवीच्या अश्रूंचा बांध फुटला होता, त्याने बारामतीकरांना गहिवरून आले.
  • यावेळी वैभवी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून म्हणाली की, अजितदादा तुमच्या आमदारामुळे राज्य नासत चाललंय. त्याला पाठीशी घालू नका, आम्हाला न्याय द्या. त्यांच्यासारख्या लोकांमुळे आमचे जगणे देखील मुश्किल झाले आहे. माझ्या वडिलांचा खंडणीसाठी जीव गेलाय, ती खंडणी कोणासाठी मागितली जात होती? त्यांचा काय गुन्हा होता, असे प्रश्न देखील वैभवीने भरसभेत विचारले.

Related Articles

Back to top button