खेळ

बिग ब्रेकिंग! टीम इंडियाने केला करेक्ट कार्यक्रम

  • भारताने चॅम्पियन ट्रॉफीवर आज आपले नाव कोरले आहे. न्यूझीलंडने अंतिम सामन्यात भारताला 251 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने षटकात पूर्व केले. भारताकडून रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत 76 धावा केल्या. त्यात 3 षटकारांचा समावेश होता. भारताची सुरूवात चांगली झाली. मात्र त्यानंतर 31 धावांवर शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर केवळ एक धाव काढून विराट कोहली ही तंबूत परतला. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. त्यांच्या या भागिदारीने विजयाचा पाया रचला. श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या.  
  • अय्यरनंतर अक्षर पटेलने 29 धावांची खेळी केली. त्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर आलेल्या केएल राहुलने डाव सावरला. त्याला हार्दीक पंड्याची साथ मिळाली. मात्र हार्दीकही 18 धावा काढून बाद झाला. त्या आधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्विकारवी. न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाच्या फिरकीपुढे लोटांगण घालताना पाहायला मिळाला. वरुण चक्रवर्ती, रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने किवींज फलंदाजांना रोखले. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या 251 धावांवर आटोपला. टीम इंडियापुढे 252 धावांचे लक्ष ठेवले होते. 

Related Articles

Back to top button