खेळ

टीम इंडियाच्या दणदणीत विजयानंतर पाकिस्तानची जळफळाट

  • भारतीय संघाने काल न्यूझीलंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवून 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी रोहित शर्माच्या हाती ट्रॉफी सोपवली.
  • पण टीम इंडियाच्या विजयानंतर आपला शेजारी पाकिस्तानमध्ये मात्र शुकशुकाट पहायला मिळाला. न्यूझीलंडच्या विजयाची प्रतिक्षा करणाऱ्या पाकिस्तानच्या हाती निराशा आली. त्यानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याची जळफळाट झाली.
  • टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला पाकिस्तानचे कोणतेही अधिकारी दिसले नाहीत, असे शोएब अख्तर म्हणाला. पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले होते. पाकिस्तान यजमान असून देखील एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता. ही गोष्ट माझ्या डोक्याच्या बाहेरची असल्याचे अख्तरने म्हटले. अंतिम फेरीत यजमान देशाचे प्रतिनिधित्व आणि सादरीकरण कुठे होते? पाकिस्तानचे अधिकारी झोपले होते का? असा सवाल अख्तर याने विचारला आहे.

Related Articles

Back to top button