कुठे दगडफेक तर कुठे जाळपोळ

भारतीय संघाने काल न्यूझीलंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवून 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. संपूर्ण देश विजयाच्या जल्लोषात बुडालेला असताना देशातील काही शहरांमध्ये दंगल सदृश्य घटना घडल्या. मध्य प्रदेशातील महू येथे जल्लोष साजरा करणाऱ्या जमावावर जोरदार दगडफेक झाली.
त्याचवेळी तेलंगणातील हैदराबाद-करीमनगर आणि महाराष्ट्रातील नागपूर येथे दोन गट आमने सामने आले. जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिन्ही ठिकाणी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला. मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथे काल रात्री टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष सुरू असताना दोन गट आमनेसामने आले.
ही घटना जामा मशिदीजवळ घडली, जिथे जल्लोष करणाऱ्या लोकांचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. यानंतर काही वेळातच हाणामारीचे रूपांतर दगडफेकीत झाले आणि परिसरात गोंधळ उडाला. असे सांगितले जात आहे की जेव्हा जल्लोष मिरवणूक मशिदीजवळ पोहोचली, तेव्हा दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला.
ज्यामुळे या घटनेला हिंसक वळण घेतले. काही समाजकंठकांनी जल्लोष करणाऱ्या लोकांवर दगडफेक करायला सुरुवात केली, त्यात अनेक लोक जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोडही केली. दुसरीकडे, महाराष्ट्रातील नागपूरमध्येही टीम इंडियाच्या विजयानंतर लोक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत होते. यावेळी गर्दी इतकी अनियंत्रित झाली की लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागले. दरम्यान, तेलंगणातील हैदराबादमध्ये विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, हैदराबाद पोलिसांनी दिलसुखनगरमध्ये जमावावर लाठीचार्ज केला. ज्या लोकांना हाकलून लावण्यात आले होते ते टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करत होते.