खेळ
विजयी जल्लोषात विराट संस्कार विसरला नाही

भारतीय संघाने काल न्यूझीलंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवून 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मैदानावर तुफान जल्लोष केला आहे. स्टंम्प हातात घेऊन फोटो काढले.
या सेलिब्रेशननंतर विराट कोहली संस्कार विसरला नाही. कोहली मैदानावर आलेल्या एका महिलेच्या पाया पडला. ही व्यक्ती मोहम्मद शमीची आई आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर मोहम्मद शमी सेलिब्रेशनसाठी त्याच्या आईला देखील घेऊन आला. यावेळी कोहलीने त्यांच्या पाया पडून आशिर्वाद घेतले. कोहलीची ही कृती साऱ्यांचे मन जिंकून गेली. विशेष म्हणजे ज्यावेळेस विराट हा शमीच्या आईच्या पाया पडला. त्यावेळेस शमीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते.