ब्रेकिंग! अजितदादांकडून अर्थसंकल्प सादर

राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजितदादा यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
अजित पवारांनी अर्थसंकल्पात काय सांगितले? उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. पुण्यातील आंबेगाव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी उभारणी. दोन टप्प्यातील काम पूर्ण, सरकार आणखी 50 कोटी देणार. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार. वढू तुळापूर येथे स्मारकाचे काम वेगाने सुरु.
हरियाणातील पानिपत येथे मराठ्यांच्या शौर्याचे यथायोग्य स्मारक. अटलबिहारी वाजपेयी जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्मारक. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत २३ हजार २३२ कोटी खर्च झाले आहेत. २ कोटी ५३ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेत २०२५ -२६ मध्ये ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे.