शेतीमध्ये एआयचा वापर ते मोफत वीज

राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळ सभागृहात सादर केला. यावेळी अर्थमंत्री अजितदादा यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
शेतकरी हा आपल्या जीवनाचा मुलाधार आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमतेचे धोरण राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी तसेच शेतीमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी एआयचा वापर होईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरु करण्यात येईल.
तसेच कालवे सुधारण्यासाठी पाच हजार कोटी, राज्यातील अपूर्ण सिंचनाची, प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीसाठी सुधारण्यासाठी पाच हजार कोटी रुपये किमतीची नाबार्ड अर्थसहाय्य पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेत डिसेंबर 7978 कोटींची सवलत देण्यात आल्याचीही घोषणा केली आहे. त्याचबरोबर राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर होणार आहे. पीएम आवास, पीएम जनमन, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, यशवंतराव चव्हाण वसाहत, धर्मवीर आनंद दिघे घरकुल अशा मोठ्या योजनांचा यामध्ये समावेश असल्याची घोषणा अजितदादा यांनी केली आहे.