राजकीय
ब्रेकिंग! शरद पवारांनीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला

- विधानसभा निवडणुकीपासून राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. मागच्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडल्या आहे. बदललेली राजकीय समीकरण, पक्ष फोडाफोडी यामुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाल्याची टीका राज ठाकरेंनी केली.
- तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालाय त्याला शरद पवार हेच जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी केला आहे.
- १९७८ साली शरद पवारांनी जर अशा राजकारणाची सुरुवात केली नसती तर राजकारणात आताची परिस्थिती दिसली नसती. हे त्यांनी १९७८ ते १९९२ पर्यंत केले. नारायण राणे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते, पण शिवसेनेतून बाहेर पडल्यावर पवारांनी हात वर केले. त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्याचे राज म्हणाले. हे सगळं शरद पवारांनीचं सांगितल्याचेही राज ठाकरे म्हणाले. शरद पवारांनी तेव्हा सुरु केलेल्या गोष्टीची पुढे सवय होत गेली. आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप लाजीरवाणी झाली आहे. कोण कुठेही जात आहे. ही निवडणूक मतदारांच्या मतांच्या अपमानाचा बदला घेण्याची असल्याचे राज म्हणाले.