खेळ
ब्रेकिंग! पाकिस्तानला नवा दणका

- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सहाव्या सामन्यात आज न्यूझीलंडने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला होता.
- तर आता बांगलादेशचा पराभव करत या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
- तर दुसरीकडे बांगलादेशच्या या पराभवामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानचा संघ देखील जवळपास बाहेर झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने शानदार कामगिरी करत शतक झळकावले आहे. त्याने 105 चेंडूंमध्ये 112 धावा केल्या.
- या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने कर्णधार नझमुल हसन शांतोच्या 77 धावांच्या आणि झाकेर अलीच्या 45 धावांच्या जोरावर 236 धावा केल्या.