मनोरंजन
छावा चित्रपट अडचणीत, शो थांबवण्याची मागणी

- सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावाची चर्चा सुरू आहे. एकीकडे ‘छावा’साठी थिएटरबाहेर प्रेक्षकांची गर्दी थांबायचे नाव घेईना आणि दुसरीकडे या सिनेमाचे शो बंद करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेड आणि काही इतिहास संशोधकांनी या सिनेमातील ऐतिहासिक विकृतीकरणावर आक्षेप घेतला आहे.
- या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज आणि सोयराबाईंबाबत काही चुकीचे प्रसंग दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संभाजी ब्रिगेड आणि इतिहास संशोधकांच्या म्हणण्यानुसार, ‘छावा’ सिनेमाच्या चित्रीकरणात छत्रपती संभाजी महाराज आणि सोयराबाईंबाबत काही कथित प्रसंग दाखवले आहेत.
- याबाबत त्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे निवेदन सादर केले असून यात योग्य पडताळणी न करता मंजुरी दिल्याची तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय ‘छावा’ सिनेमाचे ओटीटी आणि अन्य माध्यमांवर प्रदर्शन रोखण्याची त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.