खेळ
भारताचे २२ पंडित दुबईच्या स्टेडियमध्ये, त्यांच्या जादूटोण्यामुळे पाकिस्तानचा पराभव

- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. हा पराभव पाकिस्तान संघ आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनाला लागणारा आहे. कारण आता पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत.
- अशातच आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक पाकिस्तानच्या पराभवावर भलतीच चर्चा करताना दिसत आहेत. या दरम्यान एका व्यक्तीने असा दावा केला की, टीम इंडियाने काहीतरी जादूटोणा करून पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
- या पॉडकास्टवरील चर्चेदरम्यान एका व्यक्तीने सांगितले की, टीम इंडियाने आपल्या २२ पंडितांना दुबईच्या स्टेडियममध्ये पाठवले होते. पाकिस्तानच्या प्रत्येक खेळाडूसाठी दोन पंडित ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे, जे जादूटोणा करत होते.
- टीम इंडियाला पाकिस्तानात यायचे नाही, याचे कारण हेच होते. कारण ते इथे आले असते तर पंडितांना सोबत आणू शकले नसते आणि या २२ पंडितांमुळेच पाकिस्तानी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात अडचण आल्याचेही सांगण्यात आले.
- या पॉडकास्टची चर्चा इथेच थांबली नाही. आतल्या बातम्यांचा हवाला देत एका व्यक्तीने सांगितले की, सामन्याच्या एक दिवस आधी भारताने ७ पंडितांना मैदानात उतरवले होते, तोपर्यंत भारतीय संघ मैदानात पोहोचला नव्हता. पंडितांनी केलेल्या जादू टोण्यानंतरच टीम इंडियाला मैदानात आणण्यात आल्याचेही सांगण्यात आले.