मनोरंजन
ब्रेकिंग! ‘छावा’च्या पुढे नतमस्तक बॉक्स ऑफिस दोनशे, तीनशे कोटी विसरा

- ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विकी कौशल अभिनित हा चित्रपट 2025 मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला असून, या चित्रपटाच्या कमाईने अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. ‘छावा’ने केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात खूप मोठी कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.
- ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या 10 दिवसांत जागतिक स्तरावर 450 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे, ही खरंच मोठी गोष्ट आहे. चित्रपटाने नवव्या दिवशी जगभरात चारशे कोटींचा टप्पा पार करत यशस्वी चित्रपटांच्या पंक्तीत आपले स्थान पक्के केले. ‘छावा’ने दहा दिवसांत तब्बल 465.83 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि आता पाचशे कोटींच्या क्लबमध्ये लवकरच करणार, असे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, ‘छावा’ हा विकी कौशलच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे, ज्यामुळे विकीच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे.