सोलापूर

विवाहितेचा छळ ; पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

  • सोलापूर (प्रतिनिधी) लग्नात आमचा मानपान केला नाही. सोने व हुंडा दिला नाही, यावरून विवाहितेचा छळ केल्याची घटना 17 जून 2019 ते 15 मे 2024 दरम्यान फिर्यादीच्या सासरी बोरामणी येथे घडली. याप्रकरणी शिल्पा अनिल चव्हाण (वय- 28, रा.मित्र नगर, शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पती अनिल चव्हाण, सासु निर्मला चव्हाण, सासरे शिवाजी चव्हाण, नणंद उषा, सुरेखा राठोड (सर्व रा. बोरामणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
  • यात अधिक माहिती अशी की, फिर्यादी या सासरी नांदताना फिर्यादीस तुझ्या आई-वडिलांनी आमचा लग्नात मानपान केला नाही. सोने तसेच हुंडा दिला नाही यावरून माहेरच्या लोकांना वारंवार शिवीगाळ करून सोन्याची मागणी केली. 
  • फिर्यादीत शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करीत होते. तसेच उषा आणि सुरेखा राठोड यांनी पती अनिल चव्हाण याला माहेरून पैसे घेऊन यायला सांग नाहीतर हिला कायमची माहेरी हाकलून देऊन तुझे दुसरे लग्न लावून देऊ असे कान भरत असे, असे फिर्यादीत नमूद आहे.

Related Articles

Back to top button