देश - विदेश

पहाटेपासून 41 लाख भाविकांनी केले पवित्र स्नान

  • कुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविक मोठ्या संख्येने पवित्र स्नानासाठी प्रयागराजला पोहोचत आहेत. आज तीन कोटींहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार कुंभमेळा प्रशासनाने सर्व तयारी आधीच पूर्ण केली आहे.
  • सहा आठवड्यांच्या महाकुंभमेळ्याचा आज शेवटचा दिवस आहे. दर १२ वर्षांनी एकदा महाकुंभ आयोजित केला जातो आणि कुंभमेळ्यात स्नान केल्याने मोक्ष मिळतो असे मानले जाते. मागील ४४ दिवसांत मेळ्यात ६५ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. प्रयागराज संगमच्या पाण्यापासून ते व्यवस्थेपर्यंत अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले असले तरी आतापर्यंत या आव्हानांना यशस्वीरित्या तोंड दिले गेले आहे.
  • संगमात स्नान करणाऱ्यांची ही संख्या १९३ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येपेक्षा फक्त भारत आणि चीनची लोकसंख्या जास्त आहे. जगातील हिंदूंच्या लोकसंख्येच्या निम्म्या लोकसंख्येइतके लोक येथे आले आहेत, असा दावा योगी सरकारने केला.
  • महाकुंभातील शेवटच्या स्नानाच्या पार्श्वभूमीवर २५ फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून प्रयागराज शहरात वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. आज पहाटेपासून सात वाजेपर्यंत सुमारे 41 लाख भाविकांनी स्नान केले. तर, आतापर्यंत 65 कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात जाऊन स्नान केले आहे.

Related Articles

Back to top button