मनोरंजन

क्रूर औरंगजेबाचा शेवट कसा झाला?

बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाने मोठी डरकाळी फोडली आहे. या डरकाळीचा आवाज सर्वत्र ऐकायला मिळत आहे. सिनेरसिक ते राजकीय नेत्यांमध्ये छावाची चर्चा आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. दरम्यान या चित्रपटामुळे लोक पुन्हा एकदा इतिहासाची पाने चाळत आहेत. औरंगजेब संदर्भात माहिती घेत आहेत. अन्यायी बादशाह औरंगजेबचा मृत्यू कसा झाला याचा शोध घेतला जात आहे.

इतिहासात अकबरचे वर्णन उदारमतवादी तर औरंगजेबाचे वर्णन मुघल इतिहासातील सर्वात कट्टरवादी आणि क्रूर सम्राट म्हणून केले गेले आहे.

औरंगजेब बादशहा असला तरी त्याच्या आयुष्याचे शेवटचे दशक फक्त दुःखानेच भरून गेले होते. एकाकी आणि हतबल अवस्थेकडे त्याची वाटचाल होत गेली. इतर बादशहांच्या तुलनेत दीर्घायुष्य मिळाले असले तरी तेवढीच जास्त दुःखं त्याच्या वाट्याला आली.

त्याच्या मुलाचा अकबराचा इराणमध्ये मृत्यू झाला. आवडती सून 1705 साली मृत्युमुखी पडली. मुलगी झेबुन्निसाने आत्महत्या केली. त्याची बहीण गौहरआराही 1706 साली निधन पावली. 1706 साली त्याची दुसरी मुलगी मेहरुन्निसा व जावई वारले. मग त्याचा नातूही वारला. 1707 मध्ये मृत्यू होण्याआधी काही दिवस त्याचे दोन नातू वारले. असे दुःख, एकटेपण, वैफल्य यांना कवटाळून त्याला मृत्यू पत्करावा लागला.

औरंगजेबाचा अहमदनगरजवळ भिंगार येथे मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला. मुघल बादशहांमधील एका शक्तीशाली बादशहाचे मन ज्या दख्खन एकाच शब्दाने आयुष्यभर भारुन गेले होते. त्या दख्खनमधून त्याला बाहेर पडताच आले नाही. तो इथंच सुपुर्द ए खाक झाला…

Related Articles

Back to top button