मनोरंजन
कपाळी लालभडक कुंकू अन् नाकात नथ

- सोलापूरसह अन्य भागात ‘छावा’चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सर्व शो फुल्ल आहेत. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची आणि महाराणी येसूबाई यांची भूमिका महत्वाची आहे.
- चित्रपटातील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसत आहे. रश्मिकाने येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. येसूबाईंचे संघर्ष, त्यांची ताकद चित्रपटातून दिसत आहे. येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांची खूप साथ दिली. याचसोबत त्यांनी स्वराज्य उभारण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
- येसूबाई भोसले यांचा जन्म मराठ्यांचे प्रमुख सरदार राजेशिर्के यांच्या घराण्यात झाला. पुढे त्यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराज याच्यांशी झाला. स्वराज्याच्या लढ्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
- ‘छावा’ चित्रपटात अभिनेत्री रश्मिकाने महत्वाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात रश्मिकाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकरली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील रश्मिकाच्या अभिनयाचे विशेष कौतुक करत आहेत.