मनोरंजन

ब्रेकिंग! छावा चित्रपट टॅक्स फ्री करणार?

  • सोलापूरसह अन्य भागात ‘छावा’चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सर्व शो फुल्ल आहेत. दरम्यान महाराष्ट्रात ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री केला जावा, अशी मागणी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबद्दल माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. ते आज पुण्यात बोलत होते.
  • जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत, छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला. महाराजांकडून राज्यकारभार, वनसंवर्धन, जलसंवर्धन, करप्रणाली, सुरक्षा, समुद्री सुरक्षा या गोष्टी शिकता आल्या, याविषयी त्यांनी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्यकारभार करत आहोत, असे फडणवीस म्हणाले.
  • ‘छावा’ सिनेमा करमुक्त करण्याविषयी ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो. तो माफ केला जातो. महाराष्ट्राने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि राज्यात करमणूक कर हा नेहमीसाठी रद्द केला आहे. त्यामुळे आपल्याकडे करमणूक करच नाही. त्यामुळे अशा प्रकारची माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी किंवा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला अधिक काय चांगले करता येईल ते आपण करू.

Related Articles

Back to top button