देश - विदेश

ब्रेकिंग! काँग्रेस नेते राहुल गांधींकडून मोठी चूक

  • काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आपल्या अकलेचे तारे तोडले आहे. त्यामुळे राहुल हे नवीनच वादात अडकले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे भाजपा आक्रमक झाला आहे. राहुल यांच्या ट्विटनंतर भाजपाने जोरदार टीका केली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीच्या दिवशी राहुल यांनी श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट केले आहे. त्यानंतर भाजपाने म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो. जयंतीच्या दिवशी आदरांजली देतात. परंतु राहुल गांधी हे महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादार व्यक्त करतात. त्यातील हा गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असे भाजपाने म्हटले आहे.
  • राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूं। अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी। उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणास्रोत रहेगा।. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी आदरांजली ऐवजी श्रद्धांजली शब्द वापरुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे.

Related Articles

Back to top button