मनोरंजन
ब्रेकिंग! बॉक्स ऑफिसवर छावाची क्रेझ

- छावा सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळत आहे. यामुळेच छावा चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणले आहे. पहिल्या दिवशीच्या भरघोस प्रतिसादानंतर दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांची थिएटरमध्ये गर्दी पाहायला मिळाली.
- छावा चित्रपटाने पहिल्या काळात अनेक मोठे रेकॉर्ड मोडले. ‘छावा’ हा 2025 सालचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग करणारा हिंदी चित्रपट ठरला. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा 36.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे दोन दिवसांत चित्रपटाची कमाई 67.5 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने जगभरात 50 कोटी रुपये कमावले असल्याने, जगभरातील कमाई दोन दिवसांत शंभर कोटी रुपयांच्या पुढे जाईल असे म्हटले जाते.