महाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचे बदल

- विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली होती. या योजनेतून निवडणुकीपूर्वी अडीच कोटींहून अधिक महिलांना दरमहा दीड हजार रुपये हप्ता मिळाला. मात्र निवडणुकीनंतर ही योजना नियमांच्या कचाट्यात अडकलेली पाहायला मिळत आहे. सरकारने नियमावलीत वाढ करत अर्जदार महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही अपात्र महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. यानंतर आता प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
- आयकर विभागाकडे ज्या कुटुंबांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील लाभार्थींना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अनेक अपात्र महिलांनी योजनेच्या नियमांचा उल्लंघन करत लाभ घेतला होता. अशा महिलांवर आता सरकारकडून लगाम लावला जात आहे.