क्राईम
यात्रीगण कृपया ध्यान दें…दिल्ली रेल्वे स्थानकावर एक घोषणा अन्…

- नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 18 लोकांचा मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रयागराज महाकुंभात जाण्यासाठी नवी दिल्ली स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परंतु, प्रशासनाने या गर्दीचे नियोजन केले नाही असा आरोप होऊ लागला आहे.
- या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत. त्यांनी ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती दिली. रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती. परंतु प्लॅटफॉर्म 12,13,14 आणि 15 वर स्थिती अतिशय खराब झाली होती. रेल्वे थांब्याबाबत प्लॅटफॉर्मवरील नंबर बदलण्याची घोषणा सातत्याने होत होती. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
- दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला.