सोलापूर
बिग ब्रेकिंग! सोलापूर हैदराबाद रोडवर भीषण अपघात

- सोलापूर : सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक आज सायंकाळी बलकर क्रमांक एम एच 44 यू 7495 हे मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ड्रायव्हरचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बलकरने दुचाकीला धडक दिली. व उजव्या बाजूला असलेल्या तौहीद बॉडी बिल्डर या गॅरेजमध्ये घुसल्याने एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
- या अपघातात तौहिद वाजीद कुरेशी वय वर्ष 20 राहणार सरवदे नगर सोलापूर, आसिफ चॉंदपाशा बागवान वय वर्ष 45 राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर या तिघांचा मृत्यू झाला. तर सात ते आठजण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करत आहेत.