मनोरंजन
नालायक औरंगजेबाने, क्रुरतेच्या सीमा पार केल्या, शरद पोंक्षेंची ‘छावा’ चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया

- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणारा छावा चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत तुफान चालला. बहुचर्चित असणाऱ्या या चित्रपटाबद्दल अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच इंस्टाग्रामवर अभिनेता शरद पोंक्षे यांनी छावा चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
- नमस्कार! मी आताच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत, लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला छावा सिनेमा पाहिला. खूपच सुंदर सिनेमा बनवला आहे.
- प्रत्येक हिंदुस्थानीने, प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक हिंदूने हा सिनेमा जरुर बघावा. रक्त सळसळतं डोळ्यातून अश्रु थांबत नाहीत. आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी, आपल्या शंभूराजांनी एवढे कष्ट सोसले, आणि त्या नालायक औरंगजेबाने क्रुरतेच्या सीमा पार केल्या. लक्ष्मण उतेकर साहेबांनी या सिनेमाला खूप सुंदर पद्धतीने चित्रित केले आहे.
- मानले पाहिजे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे. सिनेमातील जितके पण मराठी आहेत त्या सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावल्या आहेत. अनेक वर्षांनी एक उत्कृष्ट ऐतिहासिक सिनेमा पाहायला मिळाला, असे शरद पोंक्षे यांनी पुढे म्हटले आहे. मी हात जोडून विनंती करतो की…. या सिनेमाचे जेवढं कौतुक करावे तितके कमीच.