मनोरंजन

विश्वास आपके साथ हो, तो युद्ध लगे त्योहार!

संपूर्ण देशभरात प्रदर्शित झालेला छावा चित्रपटाची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई झाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा बहुचर्चित छावा चित्रपट काल प्रदर्शित झाला.

अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. दरम्यान विक्की कौशलने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विक्की कौशलने पोस्टमध्ये लिहिले आहे की, तुमच्या प्रेमामुळे आज ‘छावा’ खऱ्या अर्थानं जिवंत झाला. तुमचे मेसेज, फोन, व्हिडीओ, चित्रपट पाहताना तुम्हाला आलेले अनुभव… या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावून गेलोय. मी सगळं काही पाहतोय… आणि चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून खूप खुश आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार… छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची शौर्यगाथा सिनेमागृहांमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार… विश्वास आपके साथ हो, तो युद्ध लगे त्योहार!, असे विक्की कौशलने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

Back to top button