मनोरंजन

चित्रपटाची शेवटची 40 मिनिटे… त्या क्षणाला खरंच नि:शब्द झाले, शब्द संपले

  • ‘छावा’ चित्रपटाने काल पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मने जिंकली. काही प्रेक्षक तर दुसऱ्यांदा हा चित्रपट पाहायला जाणार असल्याच्या कमेंट्स करत आहेत.
  • विकीचे कौतुक फक्त प्रेक्षकांनीच नाही तर त्याची लाडकी बायको कतरिना कैफनेही केले आहे.
  • कतरिनाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, किती सुंदर सिनेमॅटिक अनुभव होता… छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अतिशय सुंदर पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर तुम्ही खऱ्या अर्थाने कमाल केलीत. मी सिनेमा पाहून थक्क झाले. चित्रपटाची शेवटची 40 मिनिटे… त्या क्षणाला मी खरंच नि:शब्द झाले, माझे शब्द संपले. काल रात्री हा सिनेमा मी पाहिला आणि आज सकाळी उठल्यापासून पुन्हा एकदा मी ‘छावा’ केव्हा पाहणार असे मला झाले आहे. या चित्रपटाचा माझ्यावर खूप प्रभाव पडलाय जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, असे म्हणत तिने चित्रपट पाहिल्यानंतरचा तिचा अनुभव सांगितला.

Related Articles

Back to top button