राजकीय
भाजपचा उद्धव ठाकरेंना दणका

- राज्यात राजकीय समीकरणे सतत बदलत असताना महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून एक प्रमुख नेता पुन्हा भाजपामध्ये दाखल झाला आहे. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडून शिवसेना ठाकरे गटात गेलेले राज्य संघटक एकनाथ पवार यांनी आज पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. नांदेड येथे भाजपाच्या विशेष कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्या पुनरागमनामुळे महायुती अधिक बळकट झाली असून महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे.
- राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढत चालली आहे. अनेक नेते महायुतीत प्रवेश करत असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हालचाल अधिक गतीमान झाली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेत आहेत.