मनोरंजन
बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ‘छावा’ची डरकाळी!

- अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतिक्षित चित्रपट छावा काल सोलापूरसह अन्य चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
-
ट्रेड रिपोर्टनुसार, छावा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाईचा मोठा उच्चांक गाठला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सुमारे ३१ कोटी रूपयांची दमदार कमाई केली आहे.
- या चित्रपटांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास मांडण्यात आला. रयतेच्या स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. चित्रपटातील हे दृश्य पाहून अनेकांना गहिवरून आले होते. तरी सोलापुरातील सर्वांनी सहकुटुंब हा चित्रपट पहावा, असे आवाहन करण्यात आले आहे.