सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले अन्…

‘छावा’ सिनेमाची सोलापूरसह अन्य भागात चांगलीच चर्चा आहे. गेल्या वर्षभरापासून ‘छावा’ सिनेमाच्या टीझर, ट्रेलर, गाण्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला होता. या सिनेमाची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे. दरम्यान हा सिनेमा पाहून एका थिएटरमध्ये खास प्रसंग घडला. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर एका पेजने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘छावा’ संपल्यावर सर्व प्रेक्षक आपापल्या जागेवर उठून उभे राहिले. अशातच प्रेक्षकांमधील एक जण पुढे येऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशी घोषणा करताना दिसतो.
उपस्थित प्रेक्षकसुद्धा उभे राहून छत्रपती शिवराय अन् छत्रपती शंभूराजेंना मानवंदना देतात. हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा थिएटरमध्ये दुमदुमतात. अंगावर शहारे आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एकूणच हा सिनेमा प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.