हवामान
थंडी गायब! फेब्रुवारीतच बसू लागले उन्हाचे चटके

- गेल्या काही दिवसांपासून पहाटेचा गारठा कमी झाला आहे. हवेत हलका गारवा असून थंडी गायब झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. राज्यभर कोरडे आणि शुष्क वारे वाहत आहेत. त्यामुळे उन्हाच्या झळांचा चटका बसत आहे. येत्या चार दिवसांत राज्यात नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
- सोलापूरसह राज्यात उन्हाळा पारा वाढत आहे. काही ठिकाणी तापमान 40 अंशांच्या आसपास पोहोचले आहे. काही जिल्ह्यांमध्ये थंडी सौम्य स्वरूपात जाणवत आहे. तरी उन्हाचा चटकाही बसण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चार दिवसांमध्ये तापमान तीन ते चार अंशांनी वाढू शकते. बहुतांशी ठिकाणी हवामान कोरडे राहणार असून उष्णता वाढणार आहे.