महाराष्ट्र
ब्रेकिंग! लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय

- लाडकी बहीण योजनेत कोणतेही नवीन निकष नाहीत. पण जे निकषांमध्ये न बसताही फायदा घेत आहेत त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होतील आणि त्याची त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- आम्ही कोणाचे पैसे परत घेतलेले नाही आणि परत मागणारही नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
- या योजनेच्या निकषांमुळे पाच लाख महिला अपात्र ठरणार आहेत.
- यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. मात्र आता सरकारने निकषात न बसणाऱ्यांना अपात्र करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. याच संदर्भात फडणवीस यांनी आम्ही कोणाचे पैसे परत घेतलेले नाही आणि परत मागणार ही नाही, असे म्हटले आहे.
- या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. मात्र आता काही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार होता. मात्र सरसकट सर्वच महिलांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे आता सरकारने आयकर विभागाकडून माहिती मागवली असून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना याचा लाभ न देण्याचा निर्णय घेण्यात आला.