सोलापूर
‘त्या’ गोष्टीस नकार दिल्याने खून

- राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरातील हुडकेश्वर आनंदनगर येथील रहिवासी असलेल्या विवाहीत महिलेच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासात आरोपीने आधी गळा दाबून महिलेचा खून केला. तिचे कपडे काढून मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर महिलेला कपडे घालून फरार झाल्याचे खळबळजनक वास्तव उजेडात आले.
- रोहित गणेश टेकाम ( वय. २५, राह. पारशिवनी ) असे आरोपीचे नाव आहे. हुडकेश्वर पोलिसांनी काल दुपारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी रोहित आणि मृत महिला दोन वर्षापासून एकमेकांना ओळखतात. ते दोघेही पारडी परिसरात पेंटिंगचे काम करायचे. ओळख झाल्यामुळे त्यांनी एकमेकांना आपले मोबाईल क्रमांक दिले होते.
- हुडकेश्वर खुर्दमधील आनंदनगरात 33 वर्षीय महिला पती व दहा वर्षाच्या मुलीसह राहत होती. गुरुवारी सकाळी महिलेचा पती हॉटेलमध्ये वेटरचे काम करण्यासाठी गेला तर मुलगी शाळेत गेली होती. सकाळी 11.30 वाजता या महिलेला रोहितचा कॉल आला. तिने त्याला भेटण्यासाठी घरी बोलावले. रोहित तिच्या घरी गेल्यानंतर तिने आरोपी रोहितला दारूची बॉटल आणण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी रोहितने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्याला विरोध केल्यामुळे आरोपी रोहितने तिला धक्का देऊन खाली पाडले. महिलेच्या कानातून रक्त येत असल्यामुळे तिने आरडाओरड सुरु केली. त्यामुळे घाबरून आरोपी रोहित तेथून पळून गेला.
- काही अंतरावर गेल्यानंतर आरोपी रोहितला आपला मोबाईल महिलेच्या घरात विसरल्याचे समजल्यामुळे तो पुन्हा महिलेच्या घरी गेला. रोहित पुन्हा आल्याचे पाहून महिलेने पुन्हा आरडाओरड सुरु केली. त्यामुळे आरोपी रोहितने ओढणीने महिलेचा गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर रोहितच्या मनातील राक्षस जागा झाला. त्याने महिलेचे कपडे काढून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने महिलेला कपडे घातले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
- दरम्यान शवविच्छेदन अहवालात महिलेसोबत बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी हुडकेश्वर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास केला असता आरोपी रोहित महिलेच्या घरी आल्याचे त्यांना समजले. लगेच आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली. त्यावेळी रोहितने गुन्ह्याची कबुली दिली.