महाराष्ट्र
ब्रेकिंग! सोलापूरकरचे आणखी एक वादग्रस्त विधान

- काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर हा टीकेचा धनी ठरला होता. त्यावरून आता महाराष्ट्र शांत होतो ना होतो तोच आता त्यांचे आणखी एक विधान समोर आले असून यामध्ये त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे विधान केले आहे. या प्रकरणी सोलापूरकरने माफी मागावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. सोलापूरकरने आता सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. हा जिथे दिसेल तिथेच त्याला जोड्याने मारायला हवा. याच्यासारख्या मनुवाद्यांनीच महाराष्ट्राचे, देशाचे वाटोळे केले आहे. राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितलेली नाही. आता तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत बोलून सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. याच्या डोक्यावर नसलेले केस उगवावे लागतील, ते कसे उगवायचे, ते बहुजन आणि आंबेडकरवादी ठरवतील. या मनुवाद्यांनाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा का त्रास होतो? हेच समजत नाही. याला दिसेल तिथे तुडवा, असे म्हणत आव्हाड यांनी टीका केली आहे.
- आता व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजन घरात जन्माला आलेला एक भीमराव, जो एक आंबवडेकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतला जातो आणि त्यांचेच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो. त्याने प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसे म्हटलेले आहे. सब ब्रम्ह जानेती इति ब्राह्मण: म्हणजे अभ्यास करुन तो मोठा झालेला आहे. तसे त्या अर्थाने वेदानुसार भीमराव आंबेडकर ब्राम्हण ठरतात, असे विधान सोलापूरकरने केले आहे.