राजकीय

…तर आपला एक वेगळा पक्षच उभा राहील

  • गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे, असे विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
  • श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक कृषी महोत्सवाचे उद्घाटन नाशिकमध्ये झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पंकजा यांनी शेतकरी बांधवांना संबोधित केले.
  • यावेळी पर्यावरण, नद्या पुनर्जीविताचा विषय ते महाराष्ट्रात भाजप रुजण्यात गोपीनाथ मुंडे यांचे योगदान अशा विषयांवर पंकजा यांनी भाष्य केले.
  • मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील. पर्यायाने माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते, लोक गुणांचा स्वीकार करतात. लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात. त्यामुळे गुणांचा वारसा स्वीकारून ते माझ्याशी जोडले गेले, असे पंकजा म्हणाल्या.
  • तसेच मुंडे साहेबांनी भाजपाच्या जन्मापासून काम केले आणि तो पक्ष खऱ्या अर्थाने त्यांनीच उभा केला, असेही पंकजा म्हणाल्या. महाराष्ट्रात भाजप रुजविण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनीच केले, असेच त्यांनी थेटपणे सांगण्याचा प्रयत्न केला.

Related Articles

Back to top button