ब्रेकिंग! पुण्यात जीबीएसचे थैमान

पुण्यात दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस ) रुग्णांची संख्या शंभरीपार पोहचली आहे. गंभीर बाब म्हणजे कालच एका जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. पुण्यात ही रुग्णसंख्या वाढत असून हे चिंतेचे कारण बनले आहे.
तीनच दिवसांपूर्वी 67 नवीन प्रकरणे समोर आली होती. यात 13 रुग्णांना व्हेंटीलेटरवरही ठेवण्यात आले होते. या आजाराची व्याप्ती वाढतचअसल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. विविध रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. ही प्रकरणे उघडकीस आल्यानंतर पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभागाला जीबीएसबाबत सतर्क करण्यात आले आहे.
सध्या शंभर रुग्णांमध्ये 14 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. आतापर्यंत 101 रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे ग्रामीणमध्ये 62, पुणे महापालिका क्षेत्रात 19 रुग्ण, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 14 रुग्ण तर सहा रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. तसेच पुण्यात एकाच दिवसांत 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.