बिजनेस

अर्थसंकल्पात उल्लेख झालेली लखपती दिदी योजना नेमकी काय?

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत मांडला. त्यात सीतारमण यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या योजना मांडल्या आहेत. त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे लखपती दीदी. या योजनेबाबत सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेची संख्या दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. लखपती दीदी योजनेत आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे.
लखपती दीदी योजना ही मोदी सरकारची महिलांसाठी राबवण्यात आलेली खास योजना आहे. महिलांना सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. १५ ऑगस्ट २०२३ ला पंतप्रधान मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेत महिलांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते.
या योजनेमुळे बचत गटांशीसंबंधित असलेल्या कोट्यवधी महिलांना फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांचा या योजनेमध्ये समावेश आहे. या योजनेत स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, जो महिलांना विशिष्ट क्षेत्रातील ट्रेनिंग देते. या ट्रेनिंगच्या मदतीने त्यांना पैसे कमावता येणार आहेत. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. या योजनेत महिलांना बिझनेस सुरु करण्यासाठी विशेष ट्रेनिंग देण्यात येईल. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये महिलांना आत्मनिर्भर करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे, त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यात महिलांना बिझनेस प्लान, मार्केटिंगबाबत ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत महिलांना कमी खर्चात आरोग्य विमादेखील दिला जातो. लखपती दीदी योजना मायक्रोक्रेडिट सुविधा देतात. ज्यात महिलांना बिझनेस, शिक्षण आणि स्मॉल लोन मिळते.

Related Articles

Back to top button