मनोरंजन
ब्रेकिंग! सैफ अली खानवरील हल्ला म्हणजे मोदींना धक्का

- अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यानंतर विरोधकांकडून राज्यतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी 15 दिवसांपूर्वीच सैफने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचा उल्लेख केला आहे.
- राऊत म्हणाले की, 15 दिवसांपूर्वीच सैफ सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत एक तास व्यतीत केला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर अशाप्रकारे जीवघेणा हल्ला होणे हे मोदींसाठी धक्कादायक आहे. सैफवर चाकू हल्ला झाला. मंगळवारी मोदी मुंबईत होते. त्यांच्यामुळे संपूर्ण सुरक्षा ही त्यांच्याकडे आहे. पण मोदी जरी मुंबईत असले तरी या राज्यांमध्ये काय चालले आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवे, असे म्हणत राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल केला.
- गेल्या तीन वर्षापासून कायदा सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे. सरकार सभा, संमेलन, उत्सव, प्रधानमंत्री यांचे आगत, स्वागत शिबिर याच्यात गुंतून पडले आहे. त्यांच्यामुळे बीडपासून मुंबईपर्यंत आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. महाराष्ट्रात सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे, असे राऊत यांनी सांगितले.