शंभर कोटींचे मुंबईतील घर, आठशे कोटींचा पतोडी पॅलेस

Admin
1 Min Read
  1. बॉलिवूड अभिनेता काल मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान सैफ त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या गुगल ट्रेंडमध्ये सैफ टॉपवर आहे. सैफ बद्दल जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. सैफला भोपाळच्या राजघराण्यातील भोपाली नवाब म्हणून ओळखले जाते. भोपाळमध्ये त्याची अब्जावधींची मालमत्ता आहे, जी त्याच्या शाही वारशाचा आणि कौटुंबिक वारशाचा भाग आहे.
  2. भोपाळची राजधानीत अब्जावधींच्या मालमत्तेचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून सैफ आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सैफ आणि त्याच्या कुटुंबाकडे हजारो एकर जमीन आहे, ज्यामध्ये जुन्या भोपाळच्या अर्ध्याहून अधिक जमीन आणि आजूबाजूच्या जंगलांचा समावेश आहे. ही मालमत्ता केवळ त्याच्या चित्रपटांमधून मिळवलेल्या संपत्तीचा एक भाग नाही तर ती त्याच्या राजघराण्याच्या वारशाचे प्रतीक आहे.
  3. सैफच्या कुटुंबाची शाही मालमत्ता असलेला पतौडी पॅलेस खूप प्रसिद्ध आहे. ही मालमत्ता आता हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित झाली आहे. पतौडी पॅलेसची किंमत सुमारे आठशे कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. तसेच हा राजवाडा केवळ एक ऐतिहासिक वारसा नाही तर आजकाल पर्यटकांसाठी आणि बॉलिवूड चित्रपटांसाठी आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र बनला आहे. 
Share This Article