मनोरंजन

ब्रेकिंग! सैफ अली खानवर चाकू हल्ला, अज्ञाताने घरात घुसून मारले

हिंदी चित्रपटसृ्ष्टीतील अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात सैफ जखमी झाला असून त्याला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास सैफच्या घरी चोर घुसला होता. या दरम्यान चोराने सैफवर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

सैफवर त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी चाकू हल्ला झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून हल्लेखोराचा शोध सुरू करण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरज उत्तमानी यांना दिलेल्या माहितीनुसार सैफला या हल्ल्यात सहा जखमा झाल्या आहेत. यातील दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम पाठीच्या कण्याजवळ आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे आणि सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉ. लीना जैन यांच्या देखरेखीत सैफवर शस्त्रक्रिया सुरू आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर या जखमांमुळे शरीराचे किती नुकसान झाले याचा अंदाज येईल, असे डॉ. उत्तमानी यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button