हवामान
ब्रेकिंग! राज्यात थंडीची लाट कमी होणार?
राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात किंचित बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, थंडी कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. वाढत्या थंडीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या २४ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम असणार आहे. मात्र, त्यानंतर २५ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत राज्यातील तापमान वाढ होईल आणि थंडीची लाट हळू हळू ओसरेल.