सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात मोठे कटकारस्थान
- सोलापूर : शहरात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान बक्षीस पत्र करतेवेळी नोंदणीच्या दरम्यान बायोमेट्रिकवर अंगुली मुद्रा न देता परस्पर जाऊन कटकारस्थान केल्याप्रकरणी बोंडरायटर याच्यासह ६ जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
- या घटनेची हकीकत अशी की, गंगाधर लक्ष्मीपती देवसानी (रा. न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) याने बोंडरायटर गणेश पेंटा (रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर) याला हाताशी धरून एकत्र कुटुंबातील मिळकतीचे वाटप करताना तीन बक्षीस पत्रावर सर्व कुटुंबीयांच्या स्वाक्षऱ्या करून ते दस्त उत्तर कार्यालय क्रमांक ३ येथे नोंदवण्यास दिले. नोंदणीच्या वेळी बक्षीस पत्राच्या अगोदर जाणून-बुजून संशयित आरोपी गंगाधर लक्ष्मीपती देवसानी यांनी दामोदर लक्ष्मीपती देवसानी, अमित दामोदर देवसानी, अनिल दामोदर देवसानी, निर्मला दामोदर देवसानी (रा. सर्वजण विणकर वसाहत, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांना हाताशी धरून ही मिळकत फिर्यादी अर्चना श्रीधर देवसानी (रा.न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) यांच्या नावाने न करण्याच्या उद्देशाने नोंदणी दस्त वेळी अंगुलीमुद्रा न देता परस्पर निघून कटकारस्थान केले आणि फसवणूक केली, अशी फिर्याद अर्चना देवसानी यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली असून ६ जणावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लकडे हे करत आहेत.