क्राईम

महिलेने पार्सल उघडताच आढळला मृतदेह, सोबत दीड कोटींच्या खंडणीचे पत्र

  • आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका महिलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असलेले पार्सल मिळाल्याने तिला धक्का बसला. इतकंच नाही तर मृतदेहासोबत एक पत्रही होते, ज्यात 1.30 कोटी रुपयांची खंडणी मागणी करण्यात आली. या घटनेनंतर महिला आणि तिचे संपूर्ण कुटुंब घाबरले असून त्यांना तात्काळ या प्रकणाची पोलिसांना माहिती दिली.
  • उंडी मंडलातील येंदागांडी गावात ही घटना घडली. नागा तुलसी नावाच्या महिला सरकारने मंजूर केलेल्या जागेवर घर बांधत होती आणि घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीसाठी क्षत्रिय सेवा समितीशी संपर्क साधला होता. तिने क्षत्रिय सेवा समितीकडे रिसतर अर्जही केला होता. समितीने महिलेला फरशा पाठवल्या होत्या. या बांधकामासाठी महिलेने पुन्हा क्षत्रिय सेवा समितीकडे मदतीचे आवाहन केले. समितीने विद्युत उपकरणे देण्याचे आश्वासन दिले होते. दिवे, पंखे, स्विचेस यांसारख्या वस्तू महिलेला व्हॉट्सॲपवर पुरवल्या जातील, असा मेसेज आला.
  • दरम्यान, काल रात्री एका व्यक्तीने नागा या महिलेला एक बॉक्स आणून दिला. त्यात विद्युत उपकरणे असल्याचे सांगून तो इसम निघून गेला. नंतर तुलशीने पार्सल उघडले आणि त्यात एका व्यक्तीचा मृतदेह पाहून तिला धक्काच बसला. या संपूर्ण घटनेने तिचे कुटुंबीयही घाबरले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
  • आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अदनान नईम अस्मी यांनीही गावाला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. पार्सलमध्ये एक पत्रही सापडले असून, त्यात 1.30 कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही कुटुंबियांना देण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button